
तिरुअनंतपुरम - केरळच्या माजी आरोग्य मंत्री केके शैलजा कोरोना काळात देशभरात चर्चेत आल्या होत्या. केरळ एकाचवेळी कोरोना आणि निपाह संसर्गाशी लढा देत होता. मात्र आरोग्यमंत्री म्हणून शैलजा यांनी उत्तम काम करत केरळमधील संसर्ग नियंत्रणात आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. या कामगिरीबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा ६४ वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर होणार होता. मात्र त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नाकार दिला आहे. (k.k. shailaja news in Marathi)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या के के शैलजा यांनी सांगितले की, नोबेल पुरस्काराची आशियाई आवृत्ती मानला जाणारा मॅगसेसे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय पक्षाशी चर्चा केल्यानंतर घेतला आहे. मला पुरस्कार समितीने कळवले की पुरस्कारासाठी माझा विचार केला जात आहे. पण मी एक राजकीय नेता आहे. हा पुरस्कार सहसा राजकीय नेत्यांना दिला जात नाही, असंही शैलजा म्हणाल्या.
मी CPI(M) पक्षाच्या केंद्रीय समितीची सदस्य आहे. मी माझ्या पक्षनेतृत्वाशी यावर चर्चा केली आणि आम्ही एकत्रितपणे हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हा एक मोठा पुरस्कार आहे. पण पुरस्कार देणारी एनजीओ असून ही एनजीओ कम्युनिस्टांच्या तत्त्वांचे समर्थन करत नसल्याचंही शैलजा यांनी म्हटलं.
1957 मध्ये स्थापित, रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च सन्मान आहे. हे तिसर्या फिलीपीन राष्ट्रपतींच्या स्मृतीप्रित्यार्थ देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी आशियातील व्यक्ती आणि संस्थांना विविध क्षेत्रात समाजाची निस्वार्थ सेवा केल्याबद्दल दिला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.