
नवी दिल्ली : ‘‘पहलगाम हल्ल्यानंतरच्या जनक्षोभाचा हिंदुत्ववादी शक्तींनी मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध द्वेष भावना वाढविण्यासाठी फायदा घेण्याचा प्रयत्न केला. तर ऑपरेशन सिंदूरचा वापर भाजपकडून राजकीय लाभासाठी वापर केला जात आहे,’’ असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने(माकप) केला आहे. तसेच येत्या काही दिवसात देशभरात दहशतवादाविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णयही माकपने घेतला आहे.