esakal | आतेभावाच्या हत्येच्या प्रकरणानंतर रैना पठाणकोटमध्ये, तपासाची घेतली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketer, Suresh Raina,  murdered, Crime, Pathankot, Panjab

रैनाने थरियाल या गावी दाखल होत आपल्या नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच या हल्ल्यासंदर्भात त्याने आत्याच्या कुटुंबियातील सदस्यांकडून माहितीही घेतली. यावेळी रैनासोबत त्याच्या कुटुंबियातील अन्य सदस्यही उपस्थितीत होते.

आतेभावाच्या हत्येच्या प्रकरणानंतर रैना पठाणकोटमध्ये, तपासाची घेतली माहिती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पठाणकोट : भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाने पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील आपल्या आत्याच्या घरी भेट दिली. मागील महिन्यात एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सुरेश रैनाच्या आत्याचे पती आणि मुलगा यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिन्दर सिंह यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरल्याचे पाहायला मिळाले. रैनाने पंजाबमध्ये दाखल होताच पंजाब पोलिस आणि सरकारचे आभार मानले आहेत. 

बिहारच्या विकासात भाजपही वाटेकरी; नितीश यांना श्रेय न जाऊ देण्याची खबरदारी

संबंधित घटनेचा पोलिस योग्य तपास करत असून   याप्रकरणात सुरेश रैनाने ट्विटच्या माध्यमातून पंजाब सरकार आणि पोलिसांना योग्य तपास करावा, अशी मागणी केली होती. पोलिस प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेत एका आंतरराजीय टोळीचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रैनाने थरियाल या गावी दाखल होत आपल्या नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच या हल्ल्यासंदर्भात त्याने आत्याच्या कुटुंबियातील सदस्यांकडून माहितीही घेतली. यावेळी रैनासोबत त्याच्या कुटुंबियातील अन्य सदस्यही उपस्थितीत होते. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यात रैनाच्या आत्याचे पती अशोक कुमार आणि त्यांचा मुलगा कौशल यांचा मृत्यू झाला होता. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात रैनाची आत्याही गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  
 

loading image