shrinivas
shrinivas

कोविड औषधांचा बेकायदेशीर पुरवठा? श्रीनिवास यांची दिली पोलिसांकडून चौकशी

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने शुक्रवारी भारतीय युथ काँग्रेसचे प्रमुख श्रीनिवास बीव्ही ( IYC chief Srinivas) यांची चौकशी केली. श्रीनिवास हे राष्ट्रीय युथ काँग्रेसचे प्रमुख असून कोरोना काळात ते लोकांच्या मदतीसाठी दिवसरात्र काम करत आहे. याच प्रकरणी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या टीमने युथ काँग्रेसच्या ऑफीसला भेट दिली. यावेळी श्रीनिवास यांची चौकशी करण्यात आली. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Crime Branch questions IYC chief Srinivas over illegal distribution of Covid medicines)

युथ काँग्रेसकडून बेकायदेशीरपणे औषधांचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने श्रीनिवास यांना काही प्रश्व विचारले. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, यापूर्वी आप आमदार दिलीप पांडे यांची याच प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, ते कोर्टाच्या आदेशानुसार काम करत आहेत.

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते चिन्मय बिस्वाल यांनी सांगितलं की, डॉ. दिपक सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, काही राजकीय नेते बेकायदेशीरपणे कोविड औषधांचा पुरवठा करत आहेत. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार याप्रकरणी चर्चेत असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिस कमीशनर एस एन श्रीवास्तव यांनी याप्रकरणी चौकशीला परवानगी दिली होती.

याचिकाकर्त्याने दिलेल्या नावांमध्ये, आप आमदार पांडे, राष्ट्रीय युवा काँग्रेस प्रमुख श्रीनिवास, भाजप खासदार गौतम गंभीर, सुजय विखे, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, काँग्रेस आमदार मुकेश शर्मा यांचा समावेश आहे. कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये कोविड औषधे, ऑक्सिजन सिलिंडर याची कमतरता आहे. पण, अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटिंकडे याचा साठा असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांच्याकडून लोकांना मदत होत आहे.

shrinivas
Srinivas BV : कोरोना संकटात ठरतोय देवदूत, परदेशातही चर्चा

दरम्यान, IYC अध्यक्ष श्रीनीवास बी. वी. यांनी कोरोना काळात लोकांची सर्वप्रकारे मदत केलीये. दररोज जवळपास हजार लोक त्यांच्याकडे मदत मागत आहेत. लोकांना प्लाज्मा, ऑक्सिजन सिलिंडर, बेड्स मिळवून देण्याबरोबरच लोकांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, गरिबांसाठी जेवणाची सोय करणे अशी सर्व प्रकारची मदत श्रीनिवास यांच्या नेतृत्वातील युवा काँग्रेस करत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल-प्रियांका गांधी यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com