
केरळमधील कन्नूर मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी पहाटे एक धक्कादायक पलायनाची घटना घडली. २०११ मध्ये २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गोविंदचामी उर्फ चार्ल्स थॉमस (वय ४१) याने उच्चसुरक्षा विभागातून पलायन केले. मात्र, काही तासांतच पोलिसांनी त्याला थलप येथील नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या परिसरातील विहिरीत लपलेल्या अवस्थेत पकडले.