Crime News : कॉलेजच्या प्राचार्यालाच माजी विद्यार्थ्याने दिले पेटवून; काळजाचा थरकाप उडवणारी घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : कॉलेजच्या प्राचार्यालाच माजी विद्यार्थ्याने दिले पेटवून; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Crime News : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्हात बीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड फार्मसीच्या प्राचार्या विमुक्ता शर्मा यांना पाच दिवसांपूर्वी पेट्रोल ओतून जाळण्यात आले होते. विमुक्ता शर्मा यांचे शनिवारी पहाटे ४ वाजता चोइथराम रुग्णालयात निधन झाले.

या घटनेत प्राचार्या ८० ते 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांना गंभीर अवस्थेत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शशिकांत कनकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष यांचा मुलगा संतोष श्रीवास्तव, जो विजयश्री नगर कॉलनी येथील रहिवासी आहे, याला शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात (महू) हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी करून दुपारी त्याला घटनास्थळी नेले. आशुतोषने विमुक्ता यांच्यावर पेट्रोल ओतलेली लायटर, दुचाकी आणि बादली जप्त केली.

आरएनएस भदौरिया यांनीही आरोपींना दुपारी खंडवा रोडवरील पेट्रोल पंपावर नेले, तेथून दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजही मिळवले.

यानंतर तो त्या दुकानात पोहोचला जिथून त्याने ५० रुपये किंमतीची बादली घेतली होती. पोलिसांनी कलम १६४ अन्वये साक्षीदारांच्या न्यायालयासमोर जबाब नोंदवले आहेत. शनिवारी पोलीस आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत.

दुसरीकडे आमदार रमेश मंडोला, सर्व ब्राह्मण युवा संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी, नगरसेवक मनोज मिश्रा यांनी दुपारी चोईथराम रुग्णालयात दाखल प्राचार्य विमुक्ताच्या नातेवाईकांची भेट घेतली.

आयजी राकेश गुप्ता यांनी सांगितले की, ''ओळखल्या गेलेल्या गुन्ह्यांचा समावेश करून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.''

काय होतं प्रकरण?

इंदूरमधील एका खासगी फार्मसी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याने कॉलेजच्या प्राचार्या विमुक्ता शर्मा यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळले होते. काही दिवसांपूर्वी प्राचार्य आणि विद्यार्थ्यामध्ये मार्कशीटवरून वाद सुरू होता, त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे.

कॉलेज झाल्यानंतर प्राचार्या आपल्या कारमध्ये बसून घराकडे निघाल्या होत्या, त्यादरम्यान विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

आरोपी विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, तो फार्मसीचा विद्यार्थी होता पण त्याची मार्कशीट कॉलेजकडून दिली जात नव्हती, त्यामुळे तो खूप नाराज झाला आणि त्याला हे पाऊल उचलावे लागले.

त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना मार्कशीटसाठी अनेक फोन करण्यात आले तरी तो मार्कशीट घेण्यासाठी आला नाही असे कॉलेज व्यवस्थापनाने सांगितले.