Kanpur Crime: धक्कादायक! दोन अल्पवयीन मुली झाडाला लटकलेल्या आढळल्या, कुटुंबीयांचा लैंगिक अत्याचाराचा आरोप

Kanpur Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या घाटमपूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Crime News kanpur up (Photo PTI)
Crime News kanpur up (Photo PTI)esakal

Kanpur Crime:

उत्तर प्रदेशातील कानपूरच्या घाटमपूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुलींवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचाराचा केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

घटमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरौली परिसरात हा प्रकार घडला. मृत मुलींचे वय 14 आणि 16 वर्षे आहे. सायंकाळी त्या शौचासाठी बाहेर पडल्या होत्या. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. (Crime News)

मुलीचे कुटुंब मूळचे हमीरपूरचे आहे. ते बरौली येथील स्थानिक कंत्राटदार रामरूप निषाद यांच्या वीटभट्टीवर काम करतात. आरोपींनी मुलींना दारू पाजून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यांनी मुलीचा अश्लील व्हिडिओही बनवला. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी आरोपीने दोन्ही मुलींना खूप मारहाण केली होती आणि धमकावले होते.

बुधवारी सायंकाळी या मुलींना शेवटचे पाहण्यात आले. मुली रात्री त्या घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी वीटभट्टीजवळील 'बेर' झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

Crime News kanpur up (Photo PTI)
Loksabha Election 2024 : ‘मिशन ४५’ साठी काहीही? अमरावतीत राणा, मावळमध्ये बारणे कमळावर निवडणूक लढवणार?

दरम्यान भट्टीचा मालक रामरूप निषाद (48), त्याचा मुलगा राजू (18) आणि पुतण्या संजय (19) यांच्यासह तीन आरोपींनी मुलींचा व्हिडिओ बनवला आणि त्यांना धमकावले. अतिरिक्त सीपी (कायदा व सुव्यवस्था) हरीश चंद्र म्हणाले की, ब्लॅकमेलिंग मुळे मुलींनी टोकाचे पाऊल उचलले असावे. तीन आरोपींच्या मोबाईलमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे फोटो सापडले असून ते फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

चंद्रा म्हणाले, अटक करण्यात आलेले तिघे मृत मुलींचे दूरचे नातेवाईक आहेत. मुलींना मारहाण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहेत. 

Crime News kanpur up (Photo PTI)
Sharad Pawar : गोविंदबागेत शिंदे-फडणवीस? शरद पवार यांचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com