
ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. ही मुलगी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीवरुन घरी परतत असताना तिघांनी तिचे अपहरण केले शहरापासून १०-१५ किमी अंतरावर असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिला मारहाणही केल्याची माहिती समोर आली आहे.