पश्चिम बंगालमध्ये TMC च्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, भाजपने फेटाळला आरोप

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

हत्येच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परसिरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हावडा येथे मंगळवारी तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पक्षाच्या युवा संघटनांनी जोरदार निदर्शने केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाराच्या घटना घडल्याचे समोर येत आहे.  धर्मेंद्र सिंह असं गोळाबीरात मृत झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणात टीमएसीने भाजपवर आरोप केला आहे. 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या घरी जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाल्यानंतर धर्मेद सिंह याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आले.  या घटनेनंतर टीमएसीच्या कार्यकर्त्यांनी हावडा येथील बॉटेनिकल गार्डन परिसरात संताप व्यक्त करण्यासाठी जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे पाहायला मिळाले. 

"आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा", संजय राऊत आक्रमक

हत्येच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परसिरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाता पोलिस तपास करत आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.  तृणमूल काँग्रेसने हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला असून भाजपने आरोप फेटाळला आहे.  मृत व्यक्ती आणि हल्लेखोर रियल इस्टेटच्या व्यवसाय क्षेत्रातील असल्याची माहिती समोर येत असून पोलिस यासंदर्भातील तपास करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News west bengal tmc worker shot dead in howrah activists sabotage and arson