
झारखंडमधील पाकूरमध्ये एका पत्नीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. तिने तिच्या पतीवर विटेने हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग चिरडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नीला अटक केली. हत्येपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यामुळे ती संतापली आणि तिने त्याचा खून केला.