प्रणव रॉय यांच्यावर गुन्हा

पीटीआय
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

'एनडी टीव्ही'चे प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्यावर "सीबीआय'ने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. 2007-09 मध्ये थेट परकी गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंपनीने हे आरोप फेटाळले आहेत.

नवी दिल्ली - 'एनडी टीव्ही'चे प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्यावर "सीबीआय'ने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. 2007-09 मध्ये थेट परकी गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कंपनीने हे आरोप फेटाळले आहेत.

रॉय यांच्यासह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमादित्य चंद्रा व काही सरकारी अधिकाऱ्यांवरही गुन्ह्याचा कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून "एफआयआर' दाखल करण्यात आली. "सीबीआय'ने आज चंद्रा यांच्या घराची झडती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime on Pranav Roy