
देशात नोकरशाहीचा अतिरेक होत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी नुकतेच लोकशाहीबद्दल वक्तव्य केले होते.
नवी दिल्ली - देशात नोकरशाहीचा अतिरेक होत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी नुकतेच लोकशाहीबद्दल वक्तव्य केले होते. यावर चिदंबरम यांनी ट्विटद्वारे ही उपहासात्मक टीका केली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ते म्हणाले, की देशात अतिलोकशाही असल्याचे एका ज्येष्ठ नोकरशहाला वाटते. मात्र, अतिनोकरशाही असल्याचे माझ्यासारख्या एका वैतागलेल्या लोकशाहीवादी व्यक्तीला वाटते. ट्विटच्या मालिकेत त्यांनी लव्ह जिहादसाठी कायदा केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारलाही धारेवर धरले. योगी आदित्यनाथ यांचे सरकार या कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उदारमतवादी लोकशाहीच्या अवशेषावर संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन झाले, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उत्तर प्रदेश सरकारने कायदा बनवून त्यांची अंमलबजावणी करण्यात सर्वाधिक सर्जनशीलता दाखवली आहे. कुणीतरी लव्ह जिहाद नावाच्या गुन्हयाचा जावईशोध लावला असता का?
पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते