नोटाबंदीचा निर्णय दृष्टिहीन, दिशाहीन, ध्येयविरहित : बॅनर्जी

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - नोटाबंदीच्या निर्णयाला आज (बुधवार) तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या दृष्टिहीन, दिशाहीन आणि ध्येयविरहित निर्णयामुळे देशाने आपले आर्थिक स्वातंत्र्य गमावल्यची टीका त्यांनी केली आहे.

बॅनर्जी यांनी ट्‌विटरद्वारे मोदींवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,'आज तीन महिने पूर्ण झाले. बंधने आणि त्रास अद्यापही दूर झालेले नाहीत. नागरिकांनी आपले आर्थिक स्वातंत्र्य गमावले आहे. आर्थिक स्वातंत्र्य गमावले की स्वातंत्र्यही मिळत नाही. केवळ काही निवडक भांडवलदारांनाच त्रास होत नाही. सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय, तळागाळातील गरीब यांना अद्यापही त्रास होतच आहे. आणखी किती काळ हा त्रास होणार?' असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी नोटाबंदीचा निर्णय हा दृष्टिहीन, ध्येयविरहित, दिशाहीन असल्याची टीका केली आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकार सतत चर्चेसाठी तयार आहे. मात्र, विरोधकांना केवळ टीव्हीवर बाईट देण्यात रस असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आज (बुधवार) संसद भवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावजळ एकत्र येत नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करत आहेत. तृणमूलच्यावतीने हा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेतही सादर करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Critics on Demonetisation by Mamta Banerjee