

Rich Man Dies Alone
Esakal
उत्तर प्रदेशातील इटावा येथे नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडलीय. एकेकाळी मोठे उद्योगपती असलेल्या कोट्यधीशाकडे त्याच्या कुटुंबानेच पाठ फरिवली. तीन मुलं, एक मुलगी आणि पत्नी असूनही अंत्यसंस्काराला कुणीच आलं नाही. शेवटी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थेनं त्यांना शेवटचा निरोप दिला. ओळख पटल्यानंतरही कोट्यधीश असलेल्या ७० वर्षीय राजकुमार सक्सेना यांच्यावर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करायला नकार दिला.