Cross voting: 1998 च्या राज्यसभा निवडणुकीतही क्रॉस वोटिंग...त्यानंतरच शरद पवारांनी केली होती राष्ट्रवादीची स्थापना?

Cross voting in himachal pradesh Rajya Sabha: हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाली आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना मत टाकले. त्यामुळे त्यांना विजय झाला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar

नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाली आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांना मत टाकले. त्यामुळे त्यांना विजय झाला आहे. क्रॉस वोटिंगचा इतिहास तसा जुना आहे. १९९८ मध्ये देखील महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाली होती. याचमुळे नंतर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं सांगितलं जातं.(Cross voting in himachal pradesh Rajya Sabha elections)

१९९८ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाला होता. यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस निर्माण झाली होती. याचमुळे पुढे शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं. काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर शरद पवारांवर फोडण्यात आले होते.

Sharad Pawar
Praful Patel: प्रफुल्ल पेटल यांचा जुन्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; पोस्ट करुन म्हणाले...

१९९८ मध्ये काय झालं होतं?

१९९८ मध्ये काँग्रेसने राज्यसभेसाठी नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधान यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडे पुरेसे आमदार असल्याने दोघांचा सहज विजय होण्याची चिन्हं होती. भाजपकडून प्रमोद महाजन आणि शिवसेनेकडून सतीश प्रधान आणि प्रीतिश नंदी यांना उमेदवारी मिळाली होती. अपक्ष म्हणून सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा रिंगणात होते. या प्रकरणात १० आमदार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सह शरद पवारांच्या समर्थकांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. याच कारणामुळे पुढील निवडणुकीत शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं.

काँग्रेसचे उमेदवार राम प्रधान यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला होता. दुसरीकडे, अपक्ष उमेदवार कलमाडी आणि विजय दर्डा यांचा विजय झाला. शरद पवार हे राम प्रधान यांना उमेदवारी देण्याच्या विरोधात होता. त्यामुळेच त्यांच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करुन त्यांचा पराभव केला असा काँग्रेस नेत्यांचा ठाम विश्वास होता.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना

१९९८ च्या घटनेनंतर शरद पवार यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये वातावरण तयार झालं होतं. त्यामुळेच शरद पवार यांनी काँग्रेसपासून दूर होण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं. मात्र, शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होण्याचे कारण सोनिया गांधी असल्याचं म्हटलं होतं. सोनिया गांधी विदेशी असल्याने त्या पंतप्रधान पदावर विराजमान होणे पटत नसल्याने त्यांनी काँग्रेस सोडली असं शरद पवार एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

Sharad Pawar
Rajya Sabha Result: 3 राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर! सपाच्या जया बच्चन यांना सर्वाधिक मते, भाजपने किती जागा जिंकल्या?

१९९९ मध्ये सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर शरद पवार, तारिक अनवर आणि पीए संगमा यांनी बंडखोरी केली. त्यानंतर पवारांनी या दोन नेत्यांसोबत मिळून १० जून १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. याच वर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यातील विधानसभा निवडणुकीत एनसीपीने २८८ पैकी २२३ जागांवर उमेदवार उभे केले होते. पहिल्याच निवडणुकीत एनसीपीचा ५८ जागांवर विजय झाला होता.

निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसला ७५ जागा मिळाल्या. निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवली असली तरी निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. काँग्रेसचे विलासराव देखमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले होते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com