Praful Patel: प्रफुल्ल पेटल यांचा जुन्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; पोस्ट करुन म्हणाले...

प्रफुल्ल पटेल यांची काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे.
Praful Patel_Rajya Sabha
Praful Patel_Rajya Sabha

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभा खासदार बनलेले प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या जुन्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ट्विट करुन त्यांनी याची माहिती दिली. तसेच नव्या राज्यसभा टर्मबाबत पोस्टमध्ये माहिती दिली आहे. (Prafull Patel officially resignation from old rajya sabha membership and tweeted)

प्रफुल्ल पटेल यांची काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणूक बिनविरोध निवड झाली आहे. पण यापूर्वीचा त्यांचा चार वर्षांसाठीचा कार्यकाळ अद्याप शिल्लक असतानाच त्यांना नव्यानं उमेदवारी देण्यात आली. पण आता त्यांनी याच कार्यकाळाचा राजीनामा दिला आहे. २०२२ ते २०२८ हा त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ होता. (Marathi Tajya Batmya)

Praful Patel_Rajya Sabha
Mali Bus Accident: बस नदीवरील पुलावरून कोसळल्याने भीषण अपघात; 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटद्वारे आपल्या नव्या कार्यकाळाबद्दल सांगताना म्हटलं की, मी आता राज्यसभेच्या नव्या टर्मसाठी निवडलो गेलो आहे. माझा हा नवा कार्यकाळ २०२४ ते २०२३ असा असणार आहे. त्यामुळं मी आता ऑगस्ट २०३० पर्यंत राज्यसभेचा सदस्य असेल. (Latest Marathi News)

Praful Patel_Rajya Sabha
Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, काय आहे कारण?

पटेलांनी राजीनामा का दिला?

प्रफुल्ल पटेलांनी टर्म शिल्लक असतानाच नव्यानं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच उमेदवारी देण्यात आली आहे. यामागं काही राजकीय गणित असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून सांगतलं जात आहे. पटेल हे नव्यानं राज्यसभेवर गेले असले तरी त्यांनी जुन्या टर्मचा राजीनामा दिल्यानं ती जागा आता रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा असल्यानं आता या जागेवर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठवलं जाऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com