Railway Projects: रेल्वे प्रवाशांची गर्दी होणार कमी! महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये 2,339 किमीच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

७ कोटी रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.
Western Railway record earnings of Rs 68 crore in single day mumbai
Western Railway record earnings of Rs 68 crore in single day mumbaisakal

नवी दिल्ली : देशातील रेल्वे मार्गांबाबत ३२,५०० कोटी रुपयांच्या सात प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यामुळं महाराष्ट्रासह इतर नऊ राज्यांमध्ये रेल्वेचे नवे मल्टिमोड कनेक्टिव्हिटी मार्ग उभारले जाणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (crowd of railway passengers will be reduced approval of railway projects in 9 states including Maharashtra)

Western Railway record earnings of Rs 68 crore in single day mumbai
European Recession: युरोपात मंदीची लाट? जर्मनी, स्पेन, ग्रीसनंतर नेदरलँडची अर्थव्यवस्था कोलमडली

२,३३९ किमीच्या मल्टी ट्रॅकिंग रेल्वे मार्गांना मंजुरी

रेल्वे मंत्री म्हणाले, २,३३९ किमीच्या मल्टी ट्रॅकिंग रेल्वे मार्गांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळं रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल तसेच यामुळं रेल्वे प्रवाशांची गर्दी देखील कमी होईल. यामुळं भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक व्यस्त विभागांमध्ये गरजेच्या पायाभूत सुविधा विकसित होतील. (Latest Marathi News)

Western Railway record earnings of Rs 68 crore in single day mumbai
INDIA Mumbai Meeting: मुंबईतील बैठकीपूर्वीच 'इंडिया' आघाडीत बिघाडी? आप-काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

७ कोटी रोजगार उपलब्ध होणार

उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमधील ३५ जिल्ह्यांना या रेल्वे योजना सामावून घेणार आहेत. यामुळं २३३९ किमीची वाढ होणार आहे. यातून ७.०६ कोटी लोकांना रोजगार मिळणार आहे. (Marathi Tajya Batmya)

Western Railway record earnings of Rs 68 crore in single day mumbai
Sharad Pawar on Ajit Pawar: "मी लहान लोकांवर भाष्य करणार नाही"; शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा

या सर्व प्रकल्पांसाठीच्या मल्टिमोड कनेक्टिव्हिटी पीएम गतीशक्ती राष्ट्रीय योजनेचा परिणाम आहे. एकीकृत योजनेच्या माध्यमातून हे शक्य झालं आहे. प्रवाशी, माल वाहतूक आणि सेवांसाठी ही रेल्वेची कनेक्टिव्हीटी महत्वाची ठरेल असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com