Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Esakal

Loksabha Election 2024: मतदान केंद्राच्या बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता CRPF जवान; दवाखान्यात नेण्यापूर्वीच झाला मृत्यू

Loksabha Election 2024: देशभरात निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. आज अनेक ठिकाणी मतदान पार पडत आहे. यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये एका मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये सीआरपीएफचा जवान रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. जवानाच्या डोक्याला दुखापत झाली होती.

देशभरात निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. आज अनेक ठिकाणी मतदान पार पडत आहे. यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये एका मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये सीआरपीएफचा जवान रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. जवानाच्या डोक्याला दुखापत झाली होती. लोकांनी त्याला पाहिल्यानंतर सीआरपीएफचा जवानाबाबत तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर जवानाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सीआरपीएफ जवानाला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर असलेल्या सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांचे सांगितले की, सीआरपीएफ जवान बाथरूममध्ये पडला होता, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला आहे.

Loksabha Election 2024
Crime News: धक्कादायक! आधी सामूहिक बलात्कार, नंतर कापली जीभ.. मालकिणीचे नोकराणीवर अमानुष अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. माथाभंगा येथील मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये सीआरपीएफ जवान बेशुद्धावस्थेत आढळून आला. लोकांनी पाहिल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या जवानाच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.

जवान बाथरुममध्ये पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Loksabha Election 2024
BJP Candidate: 'मी भाजपमध्ये आहे म्हणून मला गद्दार म्हणाले', भाजपच्या एकमेव मुस्लिम उमेदवाराची व्यथा

पश्चिम बंगालच्या या जागांवर होत आहे मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (शुक्रवारी) होत आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्रीही रिंगणात आहेत. मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असतील जिथे निवडणुका संपतील. पश्चिम बंगालमधील कूचबिहार, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी या तीन जागांवरही मतदान होत आहे.

Loksabha Election 2024
Arvind Kejriwal: केजरीवालांना तिहार जेलमध्ये मिळत नाहीये इन्सुलिन, आपचा आरोप; उपराज्यपालांनी मागवला अहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com