esakal | 3 वर्षाच्या चिमुकल्याला जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून वाचवलं; व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

crpf soldiers save 3 year child from terrorist bullets

जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यादरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी एका तीन वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात या मुलाच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. हा मुलगा आजोबाच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होता.

3 वर्षाच्या चिमुकल्याला जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून वाचवलं; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर- जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यादरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी एका तीन वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात या मुलाच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. हा मुलगा आजोबाच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होता. पोलिसांनी या मुलाला वाचवलं असून त्याला त्याच्या आईकडे सुपूर्द केले आहे. यासंदर्भातील एक फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात पोलिस अधिकारी लहान मुलाला सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे.

तमिळनाडूमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू अन्...
बुधवारी सकाळी सोपोरा भागात सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात एका जवानासह सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. एक तीन वर्षाचा चिमुकला मृत आजोबाच्या बाजूला बसून रडत होता. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरुच होता. त्यामुळे दहशतवाद्यांना मारण्याबरोबरच या मुलाला वाचवण्याचे आव्हान जवानांपुढे होते. सुरक्षा दलांना या मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. घडलेल्या प्रकारामुळे मुलगा प्रचंड घाबरला होता आणि सतत रडत होता. पोलिस अधिकारी या मुलांचे सांत्वन करत त्याच्याशी गप्पा मारत असल्याचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांचे हल्ले वाढले आहेत. बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष्य करण्यात आले. लहान मुलगा आपल्या आजोबासोबत प्रवास करत होता. यावेळी दहशतवाद्यांकडून चालवण्यात आलेली गोळी मुलाच्या आजोबाला लागली. त्यावेळी चिमुकला आजोबाच्या शेजारी बसून रडत होता. अशावेळी जवानांनी प्राणाची बाजी लावत मुलाला वाचवलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिस अधिकाऱ्यांनी मुलाला त्याच्या घरी पोहोचवलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय हवाई दलाची ताकद काय आहे; वाचा सविस्तर

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका सीआरपीएफ जवानासह स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोन जवानांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांसह स्थानिक नागरिक आणि लहान मुलांना लक्ष्य करणे सुरु केल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अनंतपोरा येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.