
Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारं वाहन दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू झालाय तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. उधमपूर जिल्ह्यात हा अपघात झाला. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.