न्यायालयाच्या आवारातच बाँबस्फोट; तीन जखमी

वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

लखनौ : लखनौ न्यायालयाच्या परिसरात गुरुवारी दुपारी गावठी बाँबचा स्फोट झाला. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या वकिलाने दिली. हा बाँबस्फोट मला लक्ष्य करून करण्यात आला, असा दावा लखनौ बार असोसिएशनचे सहसरचिटणीस संजीव लोधी यांनी केला.

लखनौ : लखनौ न्यायालयाच्या परिसरात गुरुवारी दुपारी गावठी बाँबचा स्फोट झाला. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या वकिलाने दिली. हा बाँबस्फोट मला लक्ष्य करून करण्यात आला, असा दावा लखनौ बार असोसिएशनचे सहसरचिटणीस संजीव लोधी यांनी केला.

उत्तर प्रदेश विधानसभा इमारतीपासून केवळ एक किलोमीटर अंतरावरील आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी कार्यालयापासून जवळ असलेल्या हजरतगंज येथील लखनौ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात संजय लोधी दुपारी पावणेबाराच्या सुमारास कार्यालयात बसलेले असताना एका युवकाने त्यांच्या दिशेने गावठी बाँब फेकला. सुदैवाने या स्फोटातून लोधी बचावले. बाँब फेकणारा युवक फरारी झाला आहे. स्फोटानंतर न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले. घटनास्थळी दोन सुतळी बाँबही सापडले आहेत. वकिलांच्या दोन गटांतील वाद यामागे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तेथील सीसीटीव्ही चित्रण तपासून बाँब फेकणाऱ्या युवकाचा शोध पोलिस घेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षणाची मागणी
न्यायालयाच्या आवारात झालेल्या या घटनेवरून वकील संजीव लोधी यांनी सुरक्षेबद्दल प्रश्‍न उपस्थित केले आहेत. हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या हल्ल्यातून सुदैवाने लोधी बचावले असून यापुढे संरक्षण पुरविण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाच्या परिसरात कडोकोट सुरक्षाव्यवस्था असताना कोणी बाँब घेऊन आत प्रवेश कसा करू शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crude bomb hurled in a Lucknow court