विकास दुबेच्या एनकाउंटरवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया; म्हणाल्या....

वृत्तसंस्था
Friday, 10 July 2020

गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.

नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा आज (ता. १०) उत्तरप्रदेश पोलिसांनी खात्मा केला. या संदर्भात अनेकजण प्रतिक्रीया व्यक्त करत असून या चकमकीसंबंधी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, काल (ता. ०९) विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतरही प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टिका करणारे टि्वट केले होते. कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला, असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

विकास दुबेचा फिल्मी स्टाईल खात्मा
उत्तर प्रदेश पोलिस पथकातील अधिकाऱ्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विकास दुबे याचा फिल्मी स्टाइल खात्मा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश स्पेशल स्टास्क फोर्स (एसटीएफ) च्या वाहनातून विकास दुबेला मध्य प्रदेशमधून कानपुरच्या दिशेने नेत असताना वेगाने असणारी गाडी (ज्यात विकास दुबेला बसवण्यात आले होते) अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये विकास दुबेसह वाहनातील काही जवानही जखमी झाले. या अपघातातून सावरत असतानाच मोक्याचा फायदा उठवत विकास दुबेने एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेतली. त्यानंतर जवान आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. एसटीएफने विकासला पिस्तूल खाली ठेवत सरेंड होण्याची सूचना दिली. मात्र विकास दुबेने याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना त्याचा एन्काउंटर करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Culprit killed what about those who gave patronage says Priyanka Gandhi