देशातील कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण ७७.८८ टक्क्यांवर 

पीटीआय
Monday, 14 September 2020

भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७८ हजार पाचशेच्या वर गेली आहे. वेगाने चाचण्या आणि उपचारांमुळे मृत्युदरातही घट झाली आहे. भारतातील कोरोना मृत्युदर सध्या १.६५ इतका कमी झाला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ४७ लाखांचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी संपलेल्या चोविस तासांमध्ये देशात ९४, ३७२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून भारताचा रिकव्हरी रेट ७७.८८ टक्के झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७८ हजार पाचशेच्या वर गेली आहे. वेगाने चाचण्या आणि उपचारांमुळे मृत्युदरातही घट झाली आहे. भारतातील कोरोना मृत्युदर सध्या १.६५ इतका कमी झाला आहे. भारतात सध्या नऊ लाख ७.३ हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. भारताने कोरोना रुग्णांचा वीस लाखांचा टप्पा ७ ऑगस्टला, ३० लाखांचा टप्पा २३ ऑगस्टला आणि ४० लाखांचा टप्पा ५ सप्टेंबरला ओलांडला होता. ‘आयसीएमआर’ने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत साडे पाच कोटींहून अधिक जणांची कोरोना चाचणी झाली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाच राज्यांत सर्वाधिक कोरोनामुक्त 
देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७ लाखांच्या वर गेली आहे. यापैकी ५८ टक्के कोरोनामुक्त व्यक्ती या महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील आहेत. देशातील सक्रीय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण याच पाच राज्यांमध्ये आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cure rate of corona patients in the country is 77 percent