गुवाहाटीत संचारबंदी शिथील; दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा  

वृत्तसंस्था
Saturday, 14 December 2019

या विधेयकाला विरोधाचे याचे लोण आता पश्‍चिम बंगालमध्ये पोचले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणांवर हिंसक आंदोलने झाली. शुक्रवारी आसाममधील दिब्रुगड आणि मेघालयातील शिलॉंगमध्ये आज काही काळासाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती.

गुवाहाटी : नागरिकत्व कायद्यावरून आसामसह ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला असून, आज (शनिवार) आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये काहीकाळासाठी संचारबंदी उठविण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तूंसाठी नागरिकांच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विधेयकाला विरोधाचे याचे लोण आता पश्‍चिम बंगालमध्ये पोचले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणांवर हिंसक आंदोलने झाली. शुक्रवारी आसाममधील दिब्रुगड आणि मेघालयातील शिलॉंगमध्ये आज काही काळासाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती. आसाममधील उल्फा या बंडखोरांच्या संघटनेतील चर्चेचे समर्थन करणाऱ्या गटाचे नेते अरविंद राजखोवा यांनी या विधेयकामुळे आसाम नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. 

केंद्र विरुद्ध राज्ये; 'नागरिकत्व' कायद्यास पाच राज्यांचा विरोध 

दरम्यान, संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर त्याचे कायद्यामध्ये रूपांतर झाले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर नागालॅंडमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी वस्तूंचा साठा करण्यास सुरवात केली आहे. आज नागालॅंडची राजधानी कोहिमासह दिमापूर येथील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तशीच परिस्थिती ईशान्येकडील अन्य राज्यांमध्येही पाहायला मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew relaxed from 9am to 4pm in Guwahati