खुशखबर! आता NEFT द्वारे व्यवहार करा 24X7

वृत्तसंस्था
सोमवार, 16 डिसेंबर 2019

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात एनईएफटी (NEFT) सेवा आता आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली : नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात एनईएफटी (NEFT) सेवा आता आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध होणार आहे. सध्या एनईएफटी सुविधा ग्राहकांना कामकाजाच्या दिवसांमध्ये विशिष्ट वेळेतच वापरता येते. यापुढे मात्र वेळेची कोणतीही मर्यादा ग्राहकांवर असणार नाहीत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील शुक्रवारी आरबीआयने या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. यात 16 डिसेंबरपासून या सुविधेची अंमलबजावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याअंतर्गत अतिरिक्त इंट्राडे लिक्विडिटी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे 24X7 NEFT द्वारे व्यवहार करता येऊ शकतात. 

नवीन वर्षापासून लागणार नाही एनईएफटी शुल्क

डिसेंबर 2019 पासून एनईएफटी सेवा 24×7 उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आरबीआयने ऑगस्टमध्येच दिली होती. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पतधोरणाच्या बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली होती. यापूर्वी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर सेवा ग्राहकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेत कार्यालयीन दिवसांमध्येच ही सुविधा दिली जात होती. देशातील पेमेंट व्यवस्थेत क्रांतिकारक बदल करण्यासाठी आरबीआय पावले उचलत आहे. त्याआधी 1 जुलै 2019 पासून एनईएफटी सेवा मोफत करण्यात आली आहे. स्टेट बॅंकेसहीत अनेक बॅंकांनी एनईएफटी आणि आरटीजीएस सेवा त्यानंतर निशुल्क केली आहे.  

तसेच नव्या वर्षापासून नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरसाठी (एनईएफटी) कुठलेही शुल्क लागणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार जानेवारी 2020 पासून हा नवा नियम लागू होणार आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहारास चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बॅंकांतर्फे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customer can do transaction on NEFT by 24 by 7 says RBI