

New crisis of 'Cyclone Akvan' created in the Bay of Bengal.
Sakal
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन आता 'अकवन' (Cyclone Akvan) या चक्रीवादळात रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे. अवघ्या तीन आठवड्यांत बंगालच्या उपसागरात घोंघावणारे हे तिसरे मोठे चक्रीवादळ असून, यापूर्वी 'मुरासू' आणि 'अर्णब' चक्रीवादळांनी देशाच्या विविध भागांत मोठा पाऊस पाडला होता. या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे.