Cyclone Akvan: ‘अकवन’ चक्रीवादळाचा धोका; आरोग्य यंत्रणा, बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश

Cyclone Akvan Alert : बंगालच्या उपसागरातील अक्वान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ७५ टक्के भात पीक अद्याप शेतात असल्याने नुकसान टाळण्यासाठी , बचाव पथके आणि जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Cyclone Akvan prompts emergency preparedness measures across Jharkhand.

Cyclone Akvan prompts emergency preparedness measures across Jharkhand.

esakal

Updated on: 

झारखंड : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवन’ चक्रीवादळाच्या संभाव्य प्रभावामुळे झारखंड सरकारने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री डॉ. इरफान अंसारी यांनी गुरुवारी (१९ नोव्हेंबर) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन तासांची आढावा बैठक घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० आणि २१ नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, राज्यातील सुमारे ७५ टक्के भात पीक अद्याप शेतात असल्याने शेतीच्या नुकसानीची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...