Cyclone Alert India
esakal
देश
Cyclone Alert India : पुढील तीन दिवस देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' राज्यांत चक्रीवादळ तांडव माजवणार, IMD कडून सतर्कतेचा इशारा
Cyclone Alert India 2025 : भारतात ११ राज्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने सांगितले की, पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
Summary
आयएमडीने ११ राज्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरातून सुरू झालेले वादळ केरळमार्गे देशात प्रवेश करणार आहे.
पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
Cyclone Alert India 2025 : भारतात माॅन्सून मागे फिरला असला तरी हवामानातील अनिश्चितता अद्याप कायम आहे. येणारा आठवडा देशातील अनेक राज्यांसाठी धोक्याचा (Heavy Rainfall India) ठरू शकतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा इशारा जारी केला असून, याचा व्यापक परिणाम किनारपट्टीसह अंतर्गत भागांवरही दिसू शकतो.
