दक्षिण कोरियाकडूनही भारताला मदत; दोन विमाने दिल्लीत दाखल

दक्षिण कोरियाकडूनही भारताला मदत; दोन विमाने दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या काळात भारताला मदत करण्याचे धोरण राबविताना दक्षिण कोरियाने (South Korea) भारतासाठी वैद्यकीय साहित्य पाठविले आहे. तीन विमानांद्वारे १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator), १० व्हेंटिलेटर, १० हजार चाचणी कीट आणि इतर साहित्य भारतात येणार असून त्यापैकी दोन विमाने दिल्लीत पोहोचली आहेत. उर्वरित एक विमान रविवारी (ता. १६) भारतात दाखल होणार आहे. हे सर्व साहित्य भारतातील रेड क्रॉस संघटनेमार्फत देशभरात वितरित केले जाणार आहे. दक्षिण कोरियाने आधीही दोन विमानांतून वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला होता. तसेच ऑस्ट्रेलियातून 60 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, 1056 व्हेंटिलेटर व इतर वैद्यकीय साहित्यांचा माल भारतात पोहोचला आहे. सिंगापूरहून ऑक्सिजन सिलिंडर्स आणणारे IAF एअरक्राफ्ट चेन्नईमध्ये आज उतरले आहे. (South Korea Helped India Amid Corona Crisis)

दक्षिण कोरियाकडूनही भारताला मदत; दोन विमाने दिल्लीत दाखल
लहानग्यांना लस देण्याऐवजी ती दान करा; WHO नं केलं आवाहन

आतापर्यंत भारताला ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, फ्रान्स, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिकेने मदत केली आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नव्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांतील दैनंदिन रुग्णसंख्या तब्बल चार लाखांच्या पार गेली आहे. सध्या भारतात दररोज साधारण तीन लाखांच्या पार गेलेली आढळून येत आहेत. बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी देशात नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर गेल्या 24 तासात 4000 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 3 लाख 43 हजार 144 नवीन रुग्ण सापडले असून 3 लाख 44 हजार 776 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 2 कोटी 79 हजार 599 जण कोरोनामुक्त झाले असून 2 लाख 62 हजार 317 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.देशात सध्या 37 लाख 4 हजार 893 सक्रीय रुग्ण आहेत.

दक्षिण कोरियाकडूनही भारताला मदत; दोन विमाने दिल्लीत दाखल
सिंगल डोस 'स्पुटनिक V लाईट'चे लवकरच भारतात आगमन!

कोरोनाच्या उद्रेकामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि कडक निर्बंध आहेत. देशातील या 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com