Cyclone
Cyclone

Cyclone Michaung : 5 डिसेंबरला धडकणार 'मिचॉन्ग' चक्रीवादळ; 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. गेल्या सहा तासात हे चक्रीवादळ ताशी ९ किमी वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. १ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पुद्दुचेरीपासून ६३० किमी पूर्व-दक्षिणपूर्व भागात कमी दाबाचा केंद्रबिंदू तयार झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ही प्रणाली पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे.

येत्या १२ तासांत हे चक्रीवादळ खोल दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित होईल आणि ३ डिसेंबरपर्यंत नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात 'मिचॉन्ग' चक्रीवादळात रूपांतरित होईल. असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) दिला आहे.

हे चक्रीवादळ ४ डिसेंबरच्या सकाळपर्यंत दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकेल. ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान ५ डिसेंबरच्या दुपारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा कमाल वेग ताशी ८० ते ९० किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी १२ जिल्हा प्रशासन प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत तामिळनाडूच्या विविध जिल्ह्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी अवश्यक अशा सूचना दिल्या तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने (एनसीएमसी) शुक्रवारी बंगालच्या उपसागरातील 'मिचॉन्ग' चक्रीवादळासाठी राज्य सरकारआणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेतला.

Cyclone
IND vs AUS : भारत 2019 पासून हे करतोय; युवा संघाने परंपरा राखली; विश्वविजेतेही रोखू शकले नाहीत

या राज्यात पावसाची शक्यता

बंगालच्या दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे संकट असल्याने दक्षिण आणि पू्व भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, २ डिसेंबर रोजी उत्तर किनारपट्टी तमिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या काळात देशातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून ३ डिसेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे.

बहुतेक ठिकाणी पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, ३ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर ४, ५ डिसेंबर रोजी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. यानंतर पाऊस कमी होईल.

Cyclone
IND vs AUS 4th T20I : रायपूरमध्ये युवा संघाने विश्वविजेत्यांना लोळवत मालिकेवर केला कब्जा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com