IND vs AUS 4th T20I : रायपूरमध्ये युवा संघाने विश्वविजेत्यांना लोळवत मालिकेवर केला कब्जा

IND vs AUS 4th T20I
IND vs AUS 4th T20I esakal

India Vs Australia 4th T20I : भारताने चौथ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत 5 टी 20 सामन्यांची मालिका चौथ्या सामन्यातच 3 - 1 अशी खिशात टाकली. भारताचे 175 धावांचे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून गोलंदाजीत अक्षर पटेलने 3 तर दीपक चाहरने 2 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रिंकू सिंहने सर्वाधिक 46 धावा केल्या.

144-7 (19 Ov) : कर्णधार एकटा लढला

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने एकट्याने झुंज देत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मात्र शेवटच्या षटकात विजयासाठी 31 धावांची गरज होती. आवेश खानने शेवटच्या षटकात धावा देत भारताला सामना जिंकून दिला.

107-5 (14.4 Ov) : चांगल्या सुरूवातीनंतर कांगारूंचा डाव घसरला

भारताचे 175 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 3 षटकातच 40 धावा चोपल्या. मात्र रवी बिश्नोईने जॉश फिलिप्सला 8 धावांवर बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलने 16 चेंडूत 31 धावा करणाऱ्या ट्रॅविस हेडची शिकार केली.

हेड बाद झाल्यानंतर अक्षरने मॅकडेरमॉट (19) आणि एरॉन हार्डीला (8) बाद करत कांगारूंची अवस्था 3 बाद 52 धावा अशी केली. यानंतर टीम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा मात्र चहरने डेव्हिडला बाद करत कांगारूंना 107 धावांवर पाचवा धक्का दिला.

IND 174/9 (20) : स्लॉग ओव्हरमध्ये टीम इंडिया ढेपाळली

जितेश आणि रिंकूने पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली. मात्र ज्यावेळी स्लॉग ओव्हरमध्ये धावा करण्याची गरज होती त्यावेळी जितेश 19 चेंडूत 35 तर रिंकू 29 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव 20 षटकात 9 बाद 174 धावा केल्या.

151-4 (17.1 Ov) : जितेश - रिंकूने धुतले

ज्यावेळी धावांचा पाऊस पाडायचा होता त्याचवेळी सेट झालेला ऋतुराज बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या जितेश शर्माने आल्या आल्या फटकेबाजी सुरू केली. रिंकूनेही आपला गिअर बदलत संघाला 18 व्या षटकात 150 धावांपर्यंत पोहचवले.

111-4 (13.2 Ov) : गिअर बदलला मात्र शिलेदार गमावला

भारताची मंदावलेली धावगती वाढवण्याच्या नादात ऋतुराज गायकवाड 28 चेंडूत 32 धावा करत बाद झाला. रिंकू सिंह दुसऱ्या बाजूने 15 चेंडूत 26 धावा करत संघाला शतकी मजल मारून दिली होती.

63-3 (8.1 Ov) : सूर्यकुमार आल्या पावली माघारी 

अनुभवी श्रेयस अय्यर 8 धावा करून बाद झाल्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव देखील दोन चेंडू खेळून माघारी परतला. त्याने 1 धावेची भर घातली.

63-2 (8 Ov) : श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी 

भारताने पॉवर प्लेमध्ये 50 धावा केल्यानंतर यशस्वी जयस्वाल 37 धावा करून बाद झाल्यानंतर आलेला श्रेयस अय्यर देखील 8 धावा करून बाद झाला.

IND 50/1 (6) : पॉवर प्लेमध्ये यशस्वीचीच पॉवर 

यशस्वी जयस्वालने पॉवर प्लेमध्ये धुमाकूळ घातला. त्याने 28 चेंडूत 37 धावा ठोकल्या. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने आपल्या या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार मारला. दुसरीकडे फलंदाजी करण्याची संधीच कमी मिळालेल्या ऋतुराजने 7 धावा केल्या.

IND 24/0 (3) : यशस्वीची आक्रमक फलंदाजी

सामन्याच्या पहिल्या षटकात एकही धाव घेता न आलेल्या यशस्वी जैसवालने पुढच्या दोन षटकात तुफान फटकेबाजी करत संघाला 24 धावांपर्यंत पोहचवले.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात तब्बल 4 बादल 

रायपूरमधील सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल केले आहेत. भारताने तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि इशान किशन यांच्या ऐवजी श्रेयस अय्यर, दीपक चाहर, जितेश शर्मा आणि मुकेश कुमार यांची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियानेही आपल्या संघात 4 बदल केले आहेत.

श्रेयस अय्यर खेळणार मग कोणाचा पत्ता कट होणार? 

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर संघात परतला असून त्याला जर प्लेईंग 11 मध्ये खेळवायचं असेल तर कोणाची जागा द्यायची हा प्रश्न आहे. अय्यरला खेळवण्यासाठी तिलक वर्माला बाहेर ठेवलं जाऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com