esakal | Cyclone Nivar - तमिळनाडू, पुदुच्चेरीत पावसाचा धुमाकूळ; 40 हजार लोकांचे स्थलांतर
sakal

बोलून बातमी शोधा

tamilnadu

निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.

Cyclone Nivar - तमिळनाडू, पुदुच्चेरीत पावसाचा धुमाकूळ; 40 हजार लोकांचे स्थलांतर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेन्नई - निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यपालांनी येथे 26 आणि 27 नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर केली असून सार्वजनिक वाहतुकीवर बंद ठेवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार चक्रीवादळ तयार झाले असून ते तमिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकले आहे. यादरम्यान १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. वादळ अतितीव्र होईल, तेव्हा वाऱ्याचा वेग प्रतितास १६५ किलोमीटरपर्यंत पोचेल, अशी माहिती चेन्नईतील हवामान विभागाचे उपमहासंचालक एस. बालचंद्रन यांनी सांगितले. वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. किनारपट्टीवर व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे. तामिळनाडु, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात जवळपास 25 पथके कार्यरत आहेत. कोणत्याही आपत्तीसाठी एनडीआरएफ सज्ज आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तामिळनाडुतील 30 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर पुद्दुचेरीतून 7 हजार लोकांना सुरक्षित हलवलं आहे. 

हे वाचा - उद्योगक्षेत्राला लॉकडाउनचा धसका! मंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे उद्योजक टेन्शनमध्ये!

वाहने रेल्वे पुलावर
चेन्नईत काल रात्रीपासून ११ सेंटीमीटर तर उपनगरात २० सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. अनेक निवासी भागात पुराचे पाणी आले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून सर्वत्र पाणी असल्याने नागरिकांनी त्यांची वाहने रेल्वेच्या पुलावर उभी केली आहे.

सॅनिटायझरच्या दुष्परिणामांपासून मिळेल मुक्तता; 'हायपोक्‍लोरस ऍसिड' आहे सुरक्षित पर्याय ​

गुरुवारीही (ता.२६) वेगवान वारे व मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी उद्याही सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारीच कार्यालयात हजर राहू शकतील. दक्षिण-पश्‍चिम रेल्वेने सात रेल्वे तर विमान कंपन्यांनी चेन्नईला येणारी व जाणारी विमाने रद्द केली आहेत.

loading image