esakal | डेंग्युचा D2 स्ट्रेन प्राणघातक ठरु शकतो - ICMR संचालक
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

डेंग्युचा D2 स्ट्रेन प्राणघातक ठरु शकतो - ICMR संचालक

sakal_logo
By
दीनानाथ परब

लखनऊ: डेंग्युचा D2 स्ट्रेन (dengue D2 strain) धोकादायक ठरत आहे. उत्तर प्रदेशात (uttar pradesh) सध्या डेंग्युचा कहर सुरु आहे. या स्ट्रेनमुळे उत्तर प्रदेशच्या मथुरा, (Mathura) आग्रा आणि फिरोझाबाद जिल्ह्यात बहुसंख्य मृत्यू झाले आहेत. D2 स्ट्रेनमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो आणि ते प्राणघातक ठरु शकते, असे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी गुरुवारी सांगितले.

"डेंग्युच्या D2 स्ट्रेनमुळे मथुरा, आग्रा आणि फिरोझाबादमध्ये बहुसंख्य मृत्यू झाले आहेत. या स्ट्रेनमुळे होणारा अंतर्गत रक्तस्त्राव प्राणघातक ठरु शकतो" असे डॉ. भार्गव कोविड संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. डेंग्युची लागण होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन डॉ. व्ही.के.पॉल यांनी केले आहेत. ते नीती आयोगाचे सदस्य आहेत. डेंग्युमुळे शारीरिक व्याधी गंभीर होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो, असे पॉल म्हणाले.

हेही वाचा: Pune : रविवारीही देता येणार पर्मनंट लायसन्सची परीक्षा

डेंग्यु हा मच्छरांपासून होणारा आजार आहे. त्यामुळे मच्छरदाणी वापरण्याचे तसेच मच्छरांनी चावा घेऊ नये, संपूर्ण शरीर झाकण्याचे त्यांनी आवाहन केले. "डेंग्युमुळे मृत्यू होऊ शकतो. डेंग्युसाठी अजूनही आपल्याकडे लस नाहीय. त्यामुळे डेंग्युच्या आजाराला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मलेरियाचे सुद्धा शरीरावर वाईट परिणाम होतात. आपल्याला आजाराविरोधात लढायचे आहे" असे डॉ. पॉल म्हणाले. अलीकेच केंद्राच्या टीमने फिरोजाबादला भेट दिली. त्यात बहुतांश डेंग्युचे रुग्ण आढळून आले. टायफस आणि लेप्टोस्पायरसिसच्या रुग्णांची संख्या कमी आहे.

loading image
go to top