
DA Hike News: केंद्र सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गंत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. दिवाळीपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने डीएची घोषणा केली होती. यासंबंधीची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.