
Dalit Discrimination: शाळांवर आणि शिक्षकांवर विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवण्याची जबाबदारी असते. तसंच सामाजिक बहिष्काराच्या अनिष्ट चालीरितींविरोधात मुलांना शिक्षित करण्याचं कामही असतं. पण तामिळनाडूतील एका शाळेत मासिकपाळी सुरु असलेल्या एका दलित समाजातील विद्यार्थीनीला परीक्षा सुरु असताना शिक्षकांनी चक्क वर्गाबाहेर काढलं. यानंतर तिनं संपूर्ण पेपर हा वर्गाबाहेर बसून दिला. या घटनेमुळं मोठा संताप व्यक्त केला जात आहे.