Police Action Under SC/ST Atrocities Act
esakal
Dalit Groom Attacked During Wedding Procession : मध्य प्रदेशातील दमोह येथे मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी एका २३ वर्षीय दलित नवरदेवावर त्याच्या लग्नाच्या वरातीत हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नवरदेव घोड्यावर स्वार होऊन पारंपरिक विधीनुसार गावातून जात असताना काही व्यक्तींनी त्याला अडवून घोड्यावरून खाली ओढले आणि काठ्या-दांडक्यांनी बेदम मारहाण केली.