CM सोरेन यांच्यानंतर आता भावाची आमदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Soren Basant Soren

फाइलमध्ये निवडणूक आयोगानं त्यांच्या वतीनं आवश्यक शिफारसीही नोंदवल्या आहेत.

CM सोरेन यांच्यानंतर आता भावाची आमदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

खाण घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांचं पुढं आलं असतानाच, आता त्यांच्या भावाचं प्रकरणही चव्हाट्यावर आलंय. हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन (Basant Soren) यांची आमदारकी धोक्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission of India EC) बसंत यांच्या घोटाळ्याप्रकरणी सुनावणी पूर्ण करून फाईल राजभवनाकडं पाठवलीय. या फाइलमध्ये निवडणूक आयोगानं त्यांच्या वतीनं आवश्यक शिफारसीही नोंदवल्या आहेत. आता या प्रकरणी राज्यपालांना निर्णय घ्यायचा आहे.

हेही वाचा: Congress : अण्णांच्या आंदोलनाचे प्रमुख नेते आज राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेत काय करतायत?

राज्यपाल घेऊ शकतात कठोर निर्णय

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसंत सोरेन यांच्या प्रकरणात 29 ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण झाली. यानंतर आयोगानं आपल्या शिफारशीसह संपूर्ण अहवाल राजभवनाला सीलबंद कव्हरमध्ये पाठवलाय. या अहवालाच्या आधारे राज्यपाल रमेश बैस कठोर निर्णय घेऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आता बसंत सोरेन यांचं विधानसभेचं सदस्यत्वही धोक्यात आलं आहे. बसंत सोरेन सध्या दुमका येथून झामुमोचे आमदार आहेत. भाजपनं बसंत सोरेन यांच्याविरोधात राज्यपालांकडं तक्रार केली होती.

Web Title: Danger In Dumka Mla Basant Soren Membership Bjp Alleged Election Commission Sent Report To Jharkhand Governor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..