
20 Killed, Many Missing in Darjeeling as Torrential Rain Triggers Landslides
Sakal
दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग परिसरातील टेकड्यांवर सततच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता झाले आहेत. भूस्खलनामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, दुर्गम भागांतील अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसामुळे या भागात पर्यटकही अडकले आहेत.