esakal | RSS च्या सरकार्यवाहपदी १२ वर्षानंतर नवीन चेहरा; भय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळे
sakal

बोलून बातमी शोधा

dattatray hosabale appointed as rss sarakaryavaah nagpur news

दत्तात्रय होसबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह-सरकार्यवाह होते. त्यांची नुकतीच सरकार्यवाह म्हणून निवड झाली आहे.  तसेच ते आरएसएसचे प्रसिद्ध विचारक देखील आहेत.

RSS च्या सरकार्यवाहपदी १२ वर्षानंतर नवीन चेहरा; भय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरूमधील जनसेवा विद्या केंद्रात आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यापूर्वी भैय्याजी जोशी हे सरकार्यवाह होते. त्यांच्या जागी आता दत्तात्रस होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

हेही वाचा - क्या बात है! अधिकारी आणि बाबू आता दिसणार आणखी ‘स्मार्ट...

कोरोनाच्या काळातही धार्मिक आणि सामाजिक कार्य करणारे लोक संपर्कात आले. त्यामुळे अनेक नवीन ठिकाणांवर पोहोचणे शक्य झाले. असे कार्य करणाऱ्यांना सोबत घेऊन समाजात जनजागृती करण्यासाठी काय नवीन करता येईल, या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. दर तीन वर्षांनी केलेल्या कामांचे समीक्षण केले जाते. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या कामांत आजवर किती काम झाले आणि पुढील तीन वर्षांत कोणत्या योजना राबवायच्या यावरसुद्धा या बैठकीत कार्याची दिशा ठरवण्यात आली.

कोण आहेत दत्तात्रय होसबळे -
दत्तात्रय होसबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह-सरकार्यवाह होते. त्यांची नुकतीच सरकार्यवाह म्हणून निवड झाली आहे.  तसेच ते आरएसएसचे प्रसिद्ध विचारक देखील आहेत. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ ला कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील सोराबा तालुक्यात झाला. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे १९६८ ला संघात प्रवेश करून संघाचे स्वयंसेवन बनले. त्यानंतर १९७२ ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जोडले गेले. त्यांना २००४ मध्ये संघाच्या अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख बनविण्यात आले होते.   

संपादन - भाग्यश्री राऊत

loading image
go to top