
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत फसवणुकीची घटना घडली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्यासोबत फसवणुकीची घटना घडली आहे. तब्बल 34,000 रुपयांना तिला गंडा बसला आहे. हर्षिताने एका इ-कॉमर्स साईटवर जुना सोफा विकण्यासाठी म्हणून प्रयत्न केला होता. ज्या व्यक्तीने हा सोफा खरेदी करण्याचे नाटक केले त्यानेच हा गंडा घातला असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी काल सोमवारी सांगितलं की, या संबंधात रविवारी माहिती मिळाल्यावर आयपीसीच्या कलमांनुसार सिव्हील लाइन्स ठाण्यात एफआयआर दाखल केली गेली आहे.
हेही वाचा - लाल किल्ल्यावर सरकारनेच आपली माणसं पाठवून हिंसा केली; काँग्रेसचा आरोप
पोलिसांच्या सांगण्यानुसार, हर्षिताने सोफा विकण्यासाठी इ-कॉमर्स साईटद्वारे प्रयत्न केले होते. एका व्यक्तीने सोफा खरेदी करण्याची इच्छा दाखवत तिच्याशी संपर्क केला. अकाउंट बरोबर असल्याचं म्हणत त्याने हर्षिताच्या खात्यावर काही लहान रक्कम ट्रान्सफर केली. यानंतर त्या व्यक्तीने तिला एक क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करायला सांगितलं. जेणेकरुन ठरलेली रक्कम तिच्या बँक खात्यात पाठवता येईल. मात्र असं केल्याने हर्षिताच्या खात्यावरुन 20,000 रुपये कट झाले.
Delhi: Daughter of Chief Minister Arvind Kejriwal, duped of Rs 34,000 while she was selling a second-hand sofa over the internet (7.2.21)
A case of cheating has been registered at the Civil Lines Police Station
— ANI (@ANI) February 9, 2021
यानंतर जेंव्हा हर्षिताने त्या व्यक्तीला याबाबत तक्रार केली तेंव्हा त्याने म्हटलं की, असं चुकीने झालंय. परत याच प्रकारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिच्या खात्यावरुन आणखी 14,000 रुपये कट झाले. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मिळालेल्या तक्रारीनुसार आम्ही एफआयआर दाखल केला आहे. तसेच तपास सुरु आहे. आम्ही आरोपींना शोधत आहोत.