

Indian women now have equal legal rights in ancestral property under the Hindu Succession Act 2005, regardless of marital status.
esakal
Property Rights India: समाजात अनेकदा असे ऐकायला मिळते की, मुली लग्नानंतर सासरी जातात, त्यामुळे त्यांचा माहेरच्या (वडिलांच्या) मालमत्तेवर कोणताही हक्क नसतो. याच विचारसरणीमुळे, अनेक लोक असे मानतात की वडिलांच्या मालमत्तेवर केवळ मुलांचाच अधिकार असतो. पण कायदा प्रत्यक्षात काय सांगतो आणि मुलींना कायद्याने किती प्रमाणात अधिकार दिले आहेत, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, मुलींच्या मालमत्तेच्या अधिकारांविषयी सविस्तर जाणून घेऊया.