esakal | मुलीच्या लग्नाच्या दिवशीच मुलाचा मृत्यू; तरीही वडिलांनी...
sakal

बोलून बातमी शोधा

On Daughters Wedding Day Son Dies In Accident

मुलीच्या लग्नाच्या दिवशीच मुलाचा मृत्यू; तरीही वडिलांनी...

sakal_logo
By
वृत्तसेवा

कानपूर : मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वडिलांना मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का सहन करावा लागला. उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात ही दुर्देवी घटना घडली. घरात मुलीच्या लग्नाची धामधूम सुरु असताना राम नरेश यांना मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली. त्यांच्यासाठी तो एक मोठा धक्का होता. परंतु तरीही त्यांनी घरात मंगल कार्य असल्याने ह्दयावर दगड ठेवला व विवाहाचे सर्व विधी पूर्ण होईपर्यंत कोणालाच काही कळू दिले नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुलीला सासरी पाठवण्याचा विधी झाल्यानंतर नातेवाईक, पाहुणे मंडळींना मुलाच्या अपघाती निधनाची माहिती देताना राम नरेश बेशुद्ध झाले. लग्नाच्याच दिवशी नवरी मुलीच्या भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच एका क्षणामध्ये घरातले मंगलमय वातावरण दु:खामध्ये बदलून गेले. लग्नाला काही तास उरलेले असताना भरधाव वेगात पळणाऱ्या ट्रकच्या धडकेत त्यांचा मुलगा हिमांशूचा मृत्यू झाला.

कोण सुनील सुक्रे? ज्याचे पवारांनी मानले आभार !

बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हिमांशू लग्नाचे साहित्य घेऊन बाईकवरुन हॉलच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने धडक दिल्यानंतर हिमांशू बाईकवरुन फेकला गेला. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या हिमांशूला स्थानिक जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन गेले. पण त्याचा मृत्यू झाला होता.

का होतोय मंदाताई आणि प्रकाश आमटेंचा फोटो व्हायरल?

राम नरेश यांना याबद्दल माहीती मिळताच त्यांनी मुलीच्या लग्नाचे विधी पूर्ण होईपर्यंत कोणाला काही सांगू नका असे सर्वांना सांगितले. राम नरेश यांनी सुद्धा परिस्थिती ओळखून दु:ख मनातच दडवून ठेवले. चेहऱ्यावर दु:खाचे कोणतेही भाव न आणता मुलीच्या विवाहाच्या विधीमध्ये सहभागी झाले.

loading image