esakal | का होतोय मंदाताई आणि प्रकाश आमटेंचा फोटो व्हायरल?
sakal

बोलून बातमी शोधा

Mandatai and Prakash amtes Photo goes Viral

सध्या सोशल मिडीयाचे जग असून कधी कोणाचा आणि कसा फोटो व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असाच सध्या समाजसेवक प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई यांचा सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्या साधेपणाविषयी या फोटोत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

का होतोय मंदाताई आणि प्रकाश आमटेंचा फोटो व्हायरल?

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे : सध्या सोशल मिडीयाचे जग असून कधी कोणाचा आणि कसा फोटो व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असाच सध्या समाजसेवक प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई यांचा सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्या साधेपणाविषयी या फोटोत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सोशल मिडीयावर हा फोटो  मुंबई विमानतळ परिसरातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे एका ठिकाणी बसून अशा प्रकारे जेवण करत असल्याचे या फोटोला कॅप्शन शेअर करताना सांगण्यात येत आहे. आणि त्यांच्या साधेपणाचे कौतुकही करण्यात येत आहे. इतका साधेपणा त्यांना जगात सर्वदूर घेऊन गेला असल्याचेही सोशल मिडीया युजर्स सांगत त्यांना सलाम करत आहेत.

ही असतील महाविकासआघाडीसमोरची आव्हानं?

दरम्यान, हा फोटो कुठला आणि कधीचा आहे हे याबाबतची अद्याप निश्चित माहिती मिळालेली नसली तरी मंदाताई आणि बाबा आमटे यांचा हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल होत असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी ते कित्येक दिवसांपासून दवाखाना चालवण्याचे काम करत आगहेत. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ. प्रकाश आमटे : द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

loading image