esakal | खुशखबर! भारतात कोरोनावरील औषधाला DCGI कडून मान्यता

बोलून बातमी शोधा

खुशखबर! भारतात कोरोनावरील औषधाला DCGI कडून मान्यता
खुशखबर! भारतात कोरोनावरील औषधाला DCGI कडून मान्यता
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाचा हाहाकार सध्या देशभरात सुरु आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून सध्या परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून अलिकडे तर तीन लाखांच्या वर दैनंदिन रुग्णांचा आकडा पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये सध्या आपल्याकडे फक्त लशींचा वापर केला जात आहे. भारतात सर्वांत आधी सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस मान्यताप्राप्त ठरली होती. आतापर्यंत कोरोनाविरोधातील लढ्यासाठी कसल्याही प्रकारचे औषध उपलब्ध झाले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या 'विराफीन' (Virafin) या औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर रामबाण ठरणारं औषध Virafin ला Drugs Controller General of India ने मंजूरी दिली आहे. झायडल कॅडिला या कंपनीचं म्हणणं आहे की, हे औषध घेतल्यानंतर 7 दिवसांच्या आत रुग्णांची RT-PCR टेस्ट निगेटीव्ह आली असून 91.15 टक्के रुग्णांवर याचा परिणाम दिसून आला आहे.

हेही वाचा: 'मुख्यमंत्री असून हतबल'; केजरीवाल यांनी मोदींसमोर जोडले हात

90 टक्क्यांहून अधिक परिणामकारक

कंपनीचा असा दावा आहे की, Pegylated Interferon Alpha 2b (Verifin) हे औषध 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर परिणामकारक ठरलेलं आहे. क्लिनीकल ट्रायलमध्ये या औषधाचे 91.15 टक्क्यांपर्यंत रिझल्ट्स मिळाले आहेत. त्यामुळे रुग्णाला योग्यवेळी हे औषध दिल्यास कोरोनापासून त्याचा बचाव होण्याची शक्यता वाढली आहे. कंपनीने म्हटलंय की, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी भारतातील 20 ते 25 केंद्रांमधील 250 रुग्णांवर केली गेली होती. याचे विस्तृत निष्कर्ष लवकरच प्रकाशित केले जातील. गेल्या आठवड्यात कंपनीकडून जाहीर केलेल्या वक्तव्यात म्हटलंय की, कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर लगेचच हे औषध घेतल्यास रुग्णांना गतीने बरे होण्यास मदत होते.