उपोषणकर्त्या स्वाती मालिवाल यांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
रविवार, 15 डिसेंबर 2019

बलात्कार प्रकरणातील दोषींनी सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी उपोषण सुरु केले होते. स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यासाठी गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. अखेर आज (रविवार) पहाटे त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपोषणामुळे त्यांचे वजन 8 किलोने कमी झाले असून, अस्वस्थ वाटू लागल्यानेच त्या चक्कर येऊन त्या बेशुद्ध झाल्या.

देशभरात वाहनांसाठी आजपासून फास्टटॅग अनिवार्य, कारण...

बलात्कार प्रकरणातील दोषींनी सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी उपोषण सुरु केले होते. स्वाती मालिवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी यापूर्वीही महिलांच्या हक्कांसाठी आंदोलन केलेले आहे. दिल्लीतील निर्भयाच्या आईनेही त्यांना उपोषण सोडावे अशी मागणी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dcw Chief Swati Malival Admitted To Hospital