देशभरात वाहनांसाठी आजपासून फास्टटॅग अनिवार्य, कारण...

वृत्तसंस्था
Sunday, 15 December 2019

फास्टटॅग कुणासाठी?
महामार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रत्येक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना त्याचप्रमाणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्ट टॅगमधून केवळ तीन चाकी वाहनांना मात्र वगळण्यात आलेले आहे.

नवी दिल्ली : देशभरात राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्‍यांवर चारचाकी वाहनांना आजपासून (15 डिसेंबर) फास्टटॅग अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टटॅग नसेल तर दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्‍यांवर दुचाकी सोडून सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, नंतर ही मुदत आजपर्यंत वाढविण्यात आली होती. आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. आजपासून फास्ट टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. इंधन मानके आणि सुरक्षित वाहन मालकी इत्यादी कलमांच्या पालनासाठी फास्टटॅग आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र अद्यापही याबाबत संभ्रम कायम आहे.

Exclusive : अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

फास्टटॅग कुणासाठी?
महामार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रत्येक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना त्याचप्रमाणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्ट टॅगमधून केवळ तीन चाकी वाहनांना मात्र वगळण्यात आलेले आहे.

सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'

कसा असेल फास्टटॅग?
फास्ट टॅग म्हणजे वाहनांवर लावण्यासाठीचे रिड होणारे स्टिकर असणार आहे. वाहनाच्या समोरच्या काचेवर लावलेला फास्टटॅग टोलनाक्‍यावरील सेंसर कॅमेरा रिड करेल. त्यानंतर वाहनधारकांच्या बँक खात्यातून टोलची रक्कम वजा होईल. यासाठी टोल नाक्‍यावर रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. त्याचप्रमाणे सुटे पैसे देण्याघेण्यासाठी वेळ घालवण्याचीही गरज राहणार नाही. टोल किती भरावा लागला हे समजण्यासाठी खातेदाराला त्वरीत मोबाईवर मॅजेस येईल. त्याचप्रमाणे ईमेलवरही त्याची माहिती मिळणार आहे. ही प्रक्रिया अवघ्या एका मिनिटाच्या पुर्वी होणार आहे.

कसा मिळेल फास्टटॅग?
फास्टटॅगसाठी जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकांनी आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह अन्य बँकांनी फ्रेन्चायजी घेतलेली आहे. बँकेत कारसारख्या वाहनांच्या खातेदाराला पाचशे ते सातशे रुपये आकारणी केली जाईल. त्यामध्ये 200 रुपये डिपॉझिट, 200 रुपयांचा रिचार्ज आणि शंभर रुपये ऍक्‍टीव्हेशन चार्जेस राहणार आहेत. काही बॅंकांमध्ये सेवेच्या ही रक्कम कमी जास्त असू शकते. बँकेकडून फास्टटॅग वाहनधारकाला घरपोच मिळणार आहे. विविध बँक यावर विविध सवलतील अपघात विमा अशा काही सुविधाही देत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FASTag to Become Mandatory From Today How to Get Recharge Online