राजधानी दिल्लीत लादले जाऊ शकतात आणखी काही निर्बंध?

दिल्लीत गेल्या 24 तासांत 22,751 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
Crowd
CrowdANI

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नव्याने आणखी काही निर्बंध (Covid 19 Restriction In Delhi) लावले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये ( Delhi Restaurant ) खाण्यावर निर्बंध लादले जाऊ शकतात. मात्र, होम डिलिव्हरी आणि टेकवेची सुविधा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 22,751 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. (Delhi Corona Cases ) तर येथील सकारात्मकता दर 23.53% वर पोहोचला आहे. राजधानीत कोविडच्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर वाढत्या रूग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी आणखी काही निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (New Restriction May be Imposed In Delhi )

राजधानीत 1 मे नंतर एका दिवसात नवीन रूग्णांची ही सर्वाधिक संख्या असून, 7 मे नंतर सर्वाधिक सकारात्मकता दर आहे. गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 16 जूननंतर एका दिवसात झालेल्या मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. तत्पूर्वी, दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले होते. आपण केंद्र सरकारच्या सतत संपर्कात असून केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं केजरीवाल म्हणाले होते. लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी किमान बंधने असावीत, असा आमचा प्रयत्न असेल असे विधान केजरीवाल यांनी केले होते. (Delhi Corona Cases)

Crowd
कोरोनाचा वाढता धोका! महाराष्ट्रासह पाच राज्यांची मांडवियांसोबत बैठक

यापूर्वीही दिल्लीतील जनतेने मिळून कोरोनाच्या लाटेवर मात केली होती, यावेळीही आपण मात करू, ज्यांनी लसीकरण केलेले नाही, त्यांनी लस अवश्य घ्यावी असे सांगत लसीचा अर्थ असा नाही की तुम्हाला संसर्ग होणार नाही, परंतु ती घेतल्याने तुमच्या जीवाला धोका कमी होतो. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्यावर भर देण्याचे आवाहनदेखील केजरीवाल यांनी नागरिकांना केले आहे. (Corona Vaccination Drive)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com