कोरोनाचा वाढता धोका! महाराष्ट्रासह पाच राज्यांची मांडवियांसोबत बैठक | Covid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा विळखा आणखी आवळला; नव्या भागांत आढळताय रुग्ण

कोरोनाचा वाढता धोका! महाराष्ट्रासह पाच राज्यांची मांडवियांसोबत बैठक

नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा नागरिक आणि प्रशासनाला चिंतेत टाकले आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव येथील आरोग्य मंत्र्यांसोबत महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे दुपारी 3.30 वाजता घेण्यात येणार आहे. (Union Health Minister Mansukh Mandaviya to meet Five State Health Ministers,)

कोरोनाला (Corona Pandemic) तोंड देण्याची तयारी व याच्याशी निगडीत अन्य मुद्य्यांवर चर्चा होईल. अशी माहिती केंद्रीय सामोरे जाण्याच्या दृष्टीने करोनाला कशाप्रकारे तोंड देता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ट्विटद्वारे दिली आहे. (Mansukh Mandaviya Tweet) तसेच या बैठकीत कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था आणि तात्पुरत्या रुग्णालयांची व्यवस्था याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात. (Omicron Variant)

हेही वाचा: एसटी संपावर तोडगा?; पवार - कृती समितीच्या बैठकीला सुरूवात

पंतप्रधानांनी घेतली कोरोना आढावा बैठक

ओमिक्रॉनचा (Omicron Variant) उद्रेक देशभरात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक तयारीचा तपशील जाणून घेतला. जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा पोहोचविण्यावर भर द्यावा, बालकांच्या लसीकरण वेगाने केले जावे अशा सूचना मोदींनी दिल्या आहेत. आजपासून देशात बूस्टर डोस (Precaution Dose) देण्यात येत आहे. तसंच ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटाला लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढतीच

देशातील कोरोनाच्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटमध्ये वाढ होत चालली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) सुरु झाली असून रविवारी दिवसभरात १ लाख ७९ हजार ७२३ कोरोनाचे रुग्ण आढळले. तर २४ तासात १४६ जणांचा मृत्यू झाला. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजार ६१९ इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट १३.२९ टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; स्वतंत्र समितीद्वारे होणार चौकशी

कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनच्या (Omicron Variant Cases In India) संसर्गाचा वेग जास्त आहे. त्याचेही रुग्ण देशात झपाट्यानं वाढत आहेत. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ४ हजार ३३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधितांची संख्या असून त्याखालोखाल दिल्ली आणि गुजरातमध्ये रुग्ण आहेत. (Latest Corona News In Marathi)

Web Title: Union Health Minister Mansukh Mandaviya To Meet With Maharashtra Five States Health Ministers Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top