मृत बाळ निघाला जिवंत; मातीतून बाहेर काढता कुटुंबीयांना बसला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dead baby went alive in jammu and kashmir

मृत बाळ निघाला जिवंत; मातीतून बाहेर काढताच बसला धक्का

जन्मानंतर बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जड अंत:करणाने कुटुंबीयांनी बाळाला दफन केले. सुमारे तासाभरानंतर बाहेर काढले असता बाळ जिवंत (Dead baby went alive) होता. प्राथमिक उपचारानंतर बाळाला तातडीने श्रीनगरला रेफर करण्यात आले. रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करीत कुटुंबीयांनी आंदोलन सुरू केले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने लेबर रूममध्ये तैनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहे. हा प्रकार जम्मू-काश्मीरमधील बनिहाल येथील रुग्णालयात घडला. (Dead baby went alive in jammu and kashmir)

रामबन जिल्ह्यातील बनिहाल शहरातील रहिवासी शमीमा बेगम हिची सोमवारी (ता. २३) उपजिल्हा रुग्णालयात सामान्य प्रसूती झाली. शमीमा बेगमचा पती बशारत अहमद गुजर याच्या म्हणण्यानुसार, बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलने मृत घोषित केले. सुमारे दोन तास बाळ रुग्णालयातच होतं. गोंधळलेल्या कुटुंबाने बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. कुटुंबीयांनी रुग्णालयाजवळील होलन गावात बाळाला दफन केले आणि परत जायला लागले. दरम्यान, स्थानिक लोक जमा झाले आणि बाळाला कुटुंबाच्या मूळ गावातील स्मशानभूमीत (Cemetery) दफन करण्याचा आग्रह धरू लागले.

हेही वाचा: इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

गावकरी व कुटुंबीयांमध्ये सुमारे तासभर वाद चालला. वादानंतर कुटुंबाने बाळाला मातीतून बाहेर काढून मूळ गावातील स्मशानभूमीत (Cemetery) दफन करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी कबर खणताच बाळ जिवंत असल्याने लक्षात आले. कुटुंबीयांनी तात्काळ बाळाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बाळाला श्रीनगरला रेफर करण्यात आले.

परिचारिका, सफाई कामगार निलंबित

डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला व या घटनेचा तीव्र निषेध केला. या प्रकरणाची दखल घेत बनिहाल ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) डॉ. राबिया खान यांनी स्त्रीरोग विभागात काम करणाऱ्या ज्युनिअर स्टाफ परिचारिका आणि सफाई कामगाराला तत्काळ निलंबित केले आहे. तसेच पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Dead Baby Went Alive Jammu And Kashmir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top