...अन् शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत माणूस ७ तासानंतर झाला जीवंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead body

...अन् शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत माणूस ७ तासानंतर झाला जीवंत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनौ : डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही एक ४० वर्षीय व्यक्ती तब्बल सात तासानंतर जीवंत झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद (Moradabad UP) येथे ही घटना घडली असून मृतदेह शवागारातील फ्रिजरमध्ये ठेवला होता. सात तासानंतर मृतदेह काढण्यासाठी गेले असता तो जीवंत झाला. त्यामुळे डॉक्टर गोंधळून गेले आहेत. कुटुंबीयांचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालाय.

हेही वाचा: रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व, राणेंच्या पॅनेलचा सुपडासाफ

श्रीकेश कुमार, असे या व्यक्तीचे नाव असून ते मोरादाबादेत एका नागरी संस्थेत इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतात. त्यांना गुरुवारी रात्री वेगवान दुचाकीने धडक दिली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन करायचे असल्यामुळे मृतदेह शवागारातील फ्रिजरमध्ये ठेवण्यात आला. घटनेचा पंचानामा झाला. त्यानंतर कुटुंबीयांना कागदपत्रांवर सही केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी न्यायचा इतक्यात श्रीकेश यांच्या वहिनी मधुबाला यांचे मृतदेहाकडे लक्ष गेले. तो हालचाल करत असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो व्हायरल देखील झाला आहे. ''तो मुळीच मेलेला नाही. त्याच्या हालचालीवरून ते लक्षात येतं. तो श्वास घेत आहे आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे'' असं मधुबाला या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यानंतर पोलिस आणि डॉक्टरांना बोलाविण्यात आले.

संबंधित व्यक्तीला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात आणले होते. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी त्याला तपासले. मात्र, हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद होते. डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा त्याला तपासले. तरीही कुठलीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे त्याला मृत घोषित करण्यात आले. सकाळी पोलिस आणि त्याच्या कुटुंबीयांना तो जीवंत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून रुग्णाचा जीव वाचविणे हेच आमचं पहिलं कर्तव्य आहे, असं जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिव सिंह यांनी सांगितले.

मृत व्यक्ती जीवंत कसा झाला? -

असं एखादं दुर्मिळ प्रकरण असू शकतं. काहीवेळा रुग्णाला मृत घोषित करताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकीच हे एक प्रकरण असावं. मात्र, सध्या काहीही सांगता येण शक्य नाही, असंही डॉ. सिंह म्हणाले.

''गाईडलाइन्सनुसार मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्यात आला. त्याठिकाणी १० डिग्रीपेक्षा कमी तापमान होतं. तसेच वीजेची देखील समस्या होती. त्यामुळे फ्रिजर चालू-बंद होत होते. त्यामुळे कदाचित त्याचा जीव वाचला असावा'', अशी शक्यता एका डॉक्टरने नाव न घेण्याच्या अटीवर टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना वर्तविली. श्रीकेश जीवंत असल्याचे समजल्यानंतर त्याला मेरठ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्याच्यावर उपचार सुरू असून हळूहळू सुधारणा होत आहे. तो अजूनही शुद्धीवर आलेला नाही. मात्र, सध्या त्याला कुठलाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, असं मधुबाला म्हणाल्या.

loading image
go to top